Monday, 20 January 2020




     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे
           इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून
          त्यामध्ये पी वी सी पाईप ठेवून त्यामध्ये खडी भरून घेतली.नंतर तो पाईप काडून घेतला
          सिमेंटच्या पिशवीच्या ३ बाजूना होल घेवून मिरचीची रोपे लागवड केली
             व मध्य भागी १ रोप लावले.    



गवती चहा लागवड करून विक्री करणे
              इ ९ वी च्या मुलांनी गवती चहा भांदाच्या कडेने
      लागवड केली.त्यासाठी ५० रु खर्च आला त्यापासून
     


महिन्याला ७० ते १०० रु मिळतात.


जमीन तयार करून शेतात एक पीक घेणे
इयत्ता आठवी च्या मुलांनी टिकावाच्या साह्याने जमीन भुसभुशीत करून घेतली व त्यातील दगड गोटे काढून घेतले. त्या शेतात शेणखत मिक्स केलेनंतर गादी  वाफे तयार करण्यात आले. त्यामध्ये मेथी

भाजीच्या बिया लागवड करण्यात आली व नंतर लॅटरल पाईप टाकून घेतला आवश्यक त्या ठिकाणी तुषार सिंचन बसवण्यात आले मोटर च्या साह्याने पाण्याला प्रेशर देऊन तुषार सिंचन चालू करण्यात आले व त्याला पाणी देण्यात आले.




सात ट्रे मध्ये मेथी लागवड करून ठिबक सिंचन व तुषार सिंचन सेट तयार करणे
           इयत्ता ८वी  च्या मुलींनी सात ट्रे घेऊन त्यामध्ये माती व शेणखत तीनास एक प्रमाणात घेऊन ट्रे मध्ये भरून घेतले नंतर 16 एम एम चे लेटरल पाईप घेऊन त्या ट्रे वर ठिबक सिंचन करून घेतले व दुसऱ्या साईडला  फॉगर लावून तुषार सिंचन सेट तयार केला त्यालाच फिश टँक मधील मोटर जोडून प्रेशर देण्यात आले व मोटर चालू केल्यास ट्रे मध्ये लावलेल्या मेथीला एका साईडला थेंबाथेंबाने पाणी मिळू लागले. तर दुसऱ्या साईडला फॉगर ने  पावसाच्या स्वरूपात पाणी पडू लागले. मुलींनी मेथीचे बी दहा रुपयाचे आणले होते. त्या बियांचे मेथीच्या भाजीत रूपांतर झाल्यानंतर मुलींनी भाजी काढली. त्यापासून सहा पेंढ्या मिळाल्या मुलींनी त्याची विक्री केली. त्यातून त्यांना 60 रुपये मिळाले.


Friday, 10 January 2020

        अभियांत्रिकी विभागात इयत्ता - १० वी च्या वर्गातील मुलीनी प्लास्टर आणि पेंटिंग च्या प्रक्टील अंतर्गत शाळेतील झाडाभोवतीच्या कट्ट्याची दुरुस्ती करताना त्याला प्लास्टरिंग केले. आणि कट्ट्याला पडलेल्या भेगा लिपून टाकल्या.
अभियांत्रिकी विभागात इयत्ता १० वी चे शाळेशेजारील किराणा दुकानासाठी लोखंडी मांडणी करून दिली.या कामातून त्यांचा वेल्डिंग करण्याचा चांगला सराव झाला. व एक चांगला. अनुभव मिळाला.

Friday, 3 January 2020


          
              इलेक्ट्रिकल फिटिंग करणे .


         शेती विभागामध्ये इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल फिटिंग केली . या फिटिंग साठी सुमारे १२३५ रु खर्च आला . या कामामध्ये एकूण ३१० रु . नफा मिळाला .















     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...