Saturday, 23 December 2017

ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये दिवाळीसाठी 10 वी च्या मुलांनी LED माळा तयार केल्या. मुलांनी आकर्षक पद्धतीने  तयार केलेल्या माळा पालकांना खूप आवडल्या त्यांनी विद्यार्थ्यांची वाहवा केली आणि आणखी 10 माळांची ऑर्डर पालकांनी शाळेला दिली.







ऊर्जा पर्यावरण व गृह आरोग्य विभागातर्फे गणपती व गौरी उत्सवानिमित्त गावामध्ये स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला गावकरर्यांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. शाळेतील मुले वस्तू विक्री करत असल्यामुळे विद्यार्थांचे पालक येऊन स्टॉलवरून वस्तू घेऊन जात होते.हा स्टॉल गावात तसेच शाळेतील मुख्य दरवाज्यासमोर लावण्यात आला होता.शाळेतील शिक्षकांनी पण या स्टॉल वरून वस्तूंची खरेदी केली







गृह आरोग्य विभागा अंतर्गत शाळेमध्ये रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात आले.या शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे रक्तगट तपासून देण्यात आले.पालकांनी या उपक्रमाची तोंड भरून कौतुक केले आणि पुढील वर्षी पण हा उपक्रम शाळेमध्ये घ्यावा अशी मागणी पण केली.



अभियांत्रिकी विभागामध्ये इ.10 वी च्या विद्यार्थांनी शाळेमध्ये कॅम्प्युटर ठेवण्यासाठी एक टेबल तयार केला. हा टेबल अतिशय सुरेख अशा पद्धतीने  तयार केला होता. तो टेबल पाहून तश्याच प्रकारच्या 2 टेबल ची ऑर्डर पालकांनी दिली. पालकांकडून त्या टेबल ची वाहवा करण्यात आली. 






Saturday, 11 November 2017

शिरवळ शालेतील १० वी च्या मुलीने विज्ञान प्रदर्शन साठी प्रकल्प तयार केला त्यासाठी श्री.देशपांडे सरानी मार्गदर्शन केले.

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...