शिरवळचा इतिहास
शिरवळ हे खंडाळा तालुक्यातील औद्योगिक विकास झालेले हे छोटेशे गाव आहे. हे निरा नदी काठावर वसलेले आहे. हे गाव सातारा व पुणे या दोन जिल्ह्याचा सीमेवर वसलेले आहे.
धार्मिक ठिकाणे
अंबिका मंदिर
हे गावातले सगळ्यात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. अंबिका माता हे ग्रामदैवत असून वैशाख महिन्यात अक्षय्य तृतीयेला गावात मोठी यात्रा भरते. मंदिरातील मूर्ती पुरातन काळातील आहे. इथे प्राचीन लेणी पण आहेत हे फारच थोड्या जणांना माहित आहे
भैरवनाथ मंदिर
हे
गावातील दुसर्या क्रमाकांचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन असून
यात्रा व इतर सर्व महोत्सवांमध्ये या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
केदारेश्वर मंदिर
या पुरातन शिवायालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरातून शुभानमंगल किल्ल्यावर जायला भुयारी मार्ग होता. संकटाच्या वेळी या मार्गाचा उपयोग होत असे, असा उल्लेख सापडतो.
No comments:
Post a Comment