ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय , शिरवळ
आय.बी.टी विभाग
ज्ञानसंवर्धिनी शाळेमध्ये आय.बी.टी हा विषय गेली १० वर्षापासून शाळेमध्ये शिकवला जातो. प्रत्यक्षात सन २००७-२००८ रोजी आय.बी.टी विषय शिकवण्यास सुरवात झाली. हा विषय इ. ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना शिकवला जातो .आय.बी .टी. हा विषय शाळेमध्ये घेण्यासाठी विज्ञान आश्रम पाबळ या संस्थेचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे . तसेचे या संस्थेने आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणत उपलब्ध करून देऊन आमच्या शाळेतील आ.बी.टी आदर्श आ.बी.टी बनण्यास खऱ्या अर्थाने सहाय्य लाभले आहे . आय. बी.टी.अंतर्गत खालील विभाग शिकवले जातात .1) अभियांत्रिकी विभाग - मार्गदर्शक - श्री कोकरे बी. बी.
2) गृह आरोग्य विभाग - मार्गदर्शक - सौ.जगताप एस.एस.
३) उर्जा - पर्यावरण विभाग - मार्गदर्शक - श्री नाळे पी.बी.
४) शेती विभाग - मार्गदर्शक - श्री कोळेकर जी . के .
अभियांत्रिकी विभाग -
या विभागात खालील प्रकारची प्रात्यक्षिके घेतली जातात.अ) साहित्य ,साधनांची ओळख व मापन , सुरक्षिततेचे नियम
आ) वेल्डिंग ,सुतारकाम , सोल्डरिंग , बांधकाम
इ) थ्रेडिंग व टॅपिंग करणे
इत्यादी सारखी प्रात्यक्षिके विभागात घेतली जातात . त्याचे काही फोटो सोबत जोडलेले आहेत .
बांधकामासाठी MORTER तयार करताना
वेल्डिंगच्या सहाय्याने बेंच दुरुस्त करताना ....
खो खो मैदानाचे मापन करताना .....
सुतारकाम पोळपाट बनविताना ....
हायड्रोपोनिक यंत्र तयार करताना .....
गृह आरोग्य विभाग -
या विभागात खालील प्रकारची प्रात्यक्षिके घेतली जातात.
अ) चिक्की , साॅस ,खवा, जम , जेली तयार करणे .
आ) शिवान काम , रक्त गट तपासणे , एच बी तपासणे , पाणी परीक्षण , अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे . इत्यादी प्रात्यक्षिके घेतली जातात.
नानकेट बनविताना .......
शेंगदाणा लाडू बनविताना ......
लोणचे पॅकिंग करताना .....
खवा तयार करताना .....
उर्जा - पर्यावरण विभाग -
या विभागात खालील प्रकारची प्रात्यक्षिके घेतली जातात
अ) सांकेतिक चिन्हे , सिम्पल सर्किट ,एकसर व समांतर जोडणी
आ) हत्यारे , अवजारे ओळख व वापर , वायरिंग लाईट कंट्रोल , एक स्वीच वापरून एक दिवा लावणे , अर्थिंग करणे , शोष खड्डा तयार करणे , बायोगॅस अभ्यास करणे ,
इ) वीज बिल काढणे ,डीझेल इंजिनचा अभ्यास करणे ,
इत्यादी प्रात्यक्षिके घेतली जातात.
इलेक्ट्रिक बोर्ड तयार करताना .....
सोल्डरिंग करताना ....
शोष खड्डा तयार करताना
तयार प्रोजेक्ट
शेती विभाग
या विभागात खालील प्रकारची प्रात्यक्षिके घेतली जातात
अ) जमीन तयार करणे , बीज प्रक्रिया करणे , शेतात पिक घेणे , कीड ओळखणे व तिचे मोजमाप करणे ,
आ) कलम करणे , जनावरांचे तापमान मोजणे , दातांवरून वय ठरविणे , लॅक्टोमिटर रीडिंग करणे
इ) माती परीक्षण व खतांचा वापर , जल सिंचन पध्दती , जनावरांचे वजन , दुधाची क्षमता व चार्यातील टी.डी.एन.च्या प्रमाणानुसार खाद्य ठरविणे . बॉयलर पक्षी वाढविणे . , दुधातील फॅट टेस्ट करणे . इत्यादी प्रात्यक्षिके घेतली जातात.
कलम केलेली रोपे तयार करताना ......
लागवड केलेल्या पिकांची काढणी करताना .....
जमीन तयार करताना .........
आद्रता ग्रह तयार करताना .....
No comments:
Post a Comment