Wednesday, 31 October 2018
Monday, 29 October 2018
पाईप थ्रेडिंग करणे , सनमायका चीटकावने..
,मोजमाप करणे , धार लावणे यासारख्या कामाचा अनुभव देणे.
आमच्या शाळेत आ.बी.टी. अंतर्गत अभियांत्रिकी विभागात पाईप थ्रेडिंग करणे ,
सनमायका चीटकावने.. ,मोजमाप करणे , धार लावणे यासारख्या
कामाचा अनुभव प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे व्यावहारिक जीवनातील कामे करणे विद्यार्थ्यांना
सोपे झाले आहे.
लेक्चर
स्टॅन्ड तयार केले.
अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. १० वी च्या मुलांनी आमच्या शाळेतील जुनिअर कॉलेज मध्ये लेक्चर स्टॅन्ड ची गरज आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे लेक्चर स्टॅन्ड बनवण्याची ऑर्डर आ.बी.टी. विभागात दिली. त्यानुसार इ. १० वी च्या मुलांनी लेक्चर स्टॅन्ड बनवून शाळेस दिले त्यासाठी १३१० रु खर्च आला. त्यातून ३१० रु. नफा मिळाला
वर्गपाटया दुरुस्तीची कामे केल्या.
अभियांत्रिकी
विभागातील प्रात्यक्षिक करताना इयत्ता ९ वीच्या मुलांनी प्राथमिक विभागातील जुन्या
वर्गाच्या पाट्यांना U हुक लावली. त्याचप्रमाणे पाट्यांना ग्रेडिंग केले . यासारखी
दुरुस्तीची कामे केली. त्यासाठी १०० रु.खर्च आला. या कामातून 30 रु. नफा मिळाला.
तांदूळ मांडणी तयार केली.
अभियांत्रिकी विभागातील प्रात्यक्षिक करताना इ. ,१० वी च्या वर्गातील मुलांनी
माध्यमिक विभात तांदूळ पोती ठेवण्यासाठी लोखंडी मांडणी तयार केली. त्यामुळे
तांदुळाच्या पोत्यांचे उंदरांपासून संरक्षण झाले. यासाठी २४८५ रु खर्च आला. यातून ७४६ रु. नफा मिळाला.
Saturday, 20 October 2018
Subscribe to:
Posts (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रो...
-
वातीच्या प्रेशर स्टोव्ह विषयी माहिती देणे. थोडक्यात माहिती – ऊर्जा व पर्यावरण या विभागामध्ये इ.8 वी.च्याविद्यार्थ्यांना वातीच्या प्...
-
इ. १० वी च्या मुलांनी शेणखत,पालापाचोळा,शेतातील तन ,वाळलेली झाडांची पाने तसेच गांडूळ यांचा वापर करून गांड...