Thursday, 1 November 2018


                          कारली, दोडके व काकडी लागवड करणे .

          इ- १०  वी च्या विद्यार्थ्यांनी शेती विभागात कारली, दोडके व काकडी लागवड केली . यामध्ये.मुलांनी सुरुवातीला टेरेसवर जागेची निवड केली. चागल्या जातीचे बियाणे विकत आणली व त्याची लागवड केली. रोपे चांगल्या प्रकारे ऊगवून आली परंतु धुके पडल्यामु ळे त्यावर रोग पडला त्यावर ऊपाय करण्यात आले परंतु रोपे झळून गेली .






                                         अझोला बेड तयार करणे .
           

            इ- ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शेती विभागात  अझोला बेड तयार केलेला  आहे . यामध्ये.मुलांनी सुरुवातीला टेरेसवर जागेची निवड केली. विटाचे बेड तयार केले नंतर त्यामध्ये प्लासटीकचा कागद टाकून व्यवस्तीत करून घेतला व बेड पाण्याने भरून घेतले  त्यामध्ये शेणकाला , बारीक माती,पावडर टाकून मिक्स करून घेतले त्यावर १ किलो अझोला सोडण्यात आला  ३ फुट बाय १० फुटाचे दोन बेड तयार केलेले आहेत याच्यासाठी ६०० रु खर्च आला.
   



                 जास्वंद , गुलाब, बोगनवेल, यांची रोपे तयार करणे.
           
            इ- १० वी च्या विद्यार्थ्यांनी शेती व पशुपालन   विभागातील मुलांनी जास्वंद , गुलाब, बोगनवेल, यांची रोपे तयार केली.   हे प्रात्यक्षिक करण्यासाठी ५५० रु. खर्च आला. या प्रात्यक्षिकातून ५०० ते ७०० रोपे तयार झाली आहेत. त्याची विक्री करायची आहे.
                 




                


                  तुळस, कोरफड पेरू, डाळींब यांची रोपे तयार करणे.
           
        इ- ९  वी च्या विद्यार्थ्यांनी शेती व पशुपालन तुळस, कोरफड पेरू, डाळींब यांची रोपे तयार केली.   हे प्रात्यक्षिक करण्यासाठी मुलांनी भंगार मधून दुधाचे रिकामे बॉक्स आणून त्यामध्ये लागवड केली. 





                          झेंडूच्या रोपांची लागवड  करणे  .
        
                         इ- १० वी च्या विद्यार्थ्यांनी शेती व पशुपालन   विभागात दसरा व दिवाळी या सणासाठी झेंडूच्या रोपांची लागवड केली.   हे प्रात्यक्षिक करण्यासाठी १५० रु. खर्च आला. या प्रात्यक्षिकातून २००  रु. नफा मिळाला.





                         बीज प्रक्रिया करणे .


              इ- ८ वी च्या विद्यार्थ्यांनी शेती विभागात मेथीच्या बियांना बीज प्रक्रिया केलेली आहे . यामध्ये घमेल्यात मेथीच्या बिया घेऊन यावर गुळाचे पाच टक्के पाणी तयार करून शिपडले . हाताने  बिया चोळून घेतल्या व नंतर त्यांना गंधक लावले .सावलीत सुकन्याठी ठेवल्या  व नंतर त्या लागवडीसाठी घेतल्या.             





        परदेशी पाहुण्यांची IBT विभागास भेट

    

आमच्या शाळेस  दक्षिण आफ्रिकेतील काही मान्यवरांनी भेट दिली. त्याच वेळेस उपस्थित पाहुण्यांनी आमच्या शाळेतील IBT विभागासही भेट दिली.  उपक्रम व प्रकल्प या विषयी माहिती जाणून घेतेली.





 बोर्ड दुरुस्त करणे 


इ- ९  वी च्या विद्यार्थ्यांनी उर्जा व पर्यावरण  विभागात बोर्ड दुरुस्त  करण्याचे प्रात्यक्षिक केले . हे प्रात्यक्षिक करण्यासाठी ४६०  रु. खर्च आला. या प्रात्यक्षिकातून २४० रु. नफा मिळाला.


गणपती सजावट वस्तू तयार करणे


शाळेमध्ये इयत्ता ९ वीच्या  विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवानिमित्त डेकोरेशनसाठी थर्माकॉलचा पाट तयार केला. या  साठी एकूण खर्च ४५० रु आला असून या  मधून २०० रु.नफा मिळाला.





IBT प्रदर्शन




१५ ऑगस्ट निमित्त प्रशालेमध्ये पालकांसाठी IBT विभागा अंतर्गत प्रदर्शन भरवण्यात आले होते. चारही विभागांच्या या प्रदर्शनाला पालकांचा भरगोस असा प्रतिसाद मिळाला





अर्थिंग करणे.


अर्थिंग करणे.


शाळेमध्ये इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी इ- लर्निगसाठी अर्थिंग केली . या अर्थिंग साठी एकूण खर्च ३७५ रु आला असून या अर्थिंग मधून २०० रु.नफा मिळाला. 






ट्यूब लाईटची फिटिंग


ट्यूब लाईटची फिटिंग

 शाळेमध्ये इंग्रजी माध्यम विभागात ५ वर्गांमध्ये हि फिटिंग करण्यात आली. यासठी फिटिंग साठी एकूण खर्च १८५० रु आला असून या फिटिंग मधून ४६३ रु.नफा मिळाला.






     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...