Friday, 5 April 2019

गांडूळ खत तयार करणे.

इ. १० वी च्या मुलांनी शेणखत,पालापाचोळा,शेतातील तन ,वाळलेली झाडांची पाने तसेच गांडूळ यांचा वापर                                  करून गांडूळ खत तयार केले.

कलम पद्धतीने गुलाब, जास्वंद ,बोगनवेल रोपे तयार करणे.

   इ. १० वी च्या मुलांनी प्लास्टिक पिशवीत कलम पद्धतीने गुलाब, जास्वंद ,बोगनवेल यांची ५०० रोपे तयार केली.

व्हर्टिकल बॅग भरणे.

इ. १० वी च्या विद्याथ्यांनी सिमेंटच्या रिकाम्या बॅगमध्ये मधी पी .व्ही. सी. पाईप ठेवून त्यामध्ये खडी भरून साइटने माती, खत भरून पोत्याला साईटने व्ही आकाराचा कट घेऊन त्यामध्ये मिरचीची रोपे लागवड केली.

    

बीजप्रक्रिया करणे.

शेती व पशुपालन विभागातील इ. ९वी च्या मुलांनी मेथीच्या बियांना बीजप्रक्रिया केली. 

जमीन तयार करणे.

इ. ८ वी च्या मुलांनी वांगी लागवड करण्यासाठी तिकावाच्या सह्याने जमीन भूसभूसित करून दगड., गोटे                              काढून जमीन तयार केली. व वांग्याची रोपे लागवड केली. 

शेती व पशुपालन विभागात कुंडी भरून रोप लागवड करणे.

इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व  खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रोपे लागवड केली.

झेंडूच्या फुलांची लागवड करणे.

               टेरेसवर इ. १० वी च्या मुलीनी सरी  वाफा तयार करून  झेंडूच्या  १०० रोपांची   लागवड केली. त्याला पाण्याची व्यवस्था म्हणून ठिंबक सिंचन करण्यात आले.त्यासाठी १५० रु खर्च झाला. झेंडूच्या फुलांची विक्री करून २०० रु नफा मिळाला.

पालक व कोथिबीर लागवड करणे.

इ. ९ वी च्या विद्याथ्यांनी  पालक व शेवगा लागवड केली .त्यासाठी मुलांनी सपाट वाफा तयार करून पालक व कोथिबीर लागवड केली.तसेच त्यासाठी पाण्याची व्यवस्था तुषार सिंचन केले.

बॅलर मध्ये शेवगा व पपई लागवड करणे

   इ. १०वी च्या विद्याथ्यांनी १० बॅलर मध्ये पपई लागवड केली.तसेच १०   बॅलर मध्ये शेवगा लागवड केली.
     

Thursday, 4 April 2019

हंगिंग गार्डन तयार करणे .

                 इ . १० वी च्या विद्याथ्यांनी   प्लास्टिक बाटल्या व पी .व्ही. सी पाईपचा वापर करून हंगिंग
                  गार्डन तयार करणे .

Monday, 1 April 2019

इलेक्ट्रीक बोर्ड तयार करणे .
सुतारकामात प्लायवूड, सनमायका  , बॅटन पट्टी, टर चुका यांचा वापर करून  वापरूनइ.९ वी च्या
विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर इलेक्ट्रीक बोर्ड तयार केले. 
DRILING AND GRINDING
अभियात्रिकी  विभागात ड्रिलिंग व ग्राइडिंग कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी या कामात अतिशय चांगले तयार होतात.


परीक्षा कालावधी मध्ये शाळेतील विद्यर्थ्याना सुतार कामांतर्गत प्लायवूड व सनमायका वापरून एक प्रकारचे मजबूत राईटिंग pad बनवून विकत असतात.
अभियांत्रिकी विभागात दुरुस्ती कामांतर्गत सुतार्कामातील बिजागरी बसविण्याच्या कामाचा अनुभव प्रत्यक्ष कामातूनच दिला जातो.
अभियांत्रिकी विभागात आमच्या शाळेतील बेंच, लेक्चर डेस्क .इत्यादींची दुरुस्तीची कामे आमचे विद्यार्थी नेहमी करत असतात.
अभियांत्रिकी विभागात  आमच्या शाळेतील शिक्षक श्री बाठे सरांनी लोखंडी टेबल बनवण्याची order दिलेली होती. त्याप्रमाणे मुलांनी डॉईग तयार केले . नंतर मापानुसार लोखंडी पाईप कापून नंतर तो वेल्डिंग च्या साह्याने जोडून घेतला.
अभियांत्रिकी विभागात शाळेतील परीक्षा विभातील स्टेशनरी ठेवण्याण्यासाठी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी सुतार् कामा अंतर्गत एक प्लायवूड पासून पेटी बनवून परीक्षा विभागात देण्यात आली. त्यामुळे मुलांना सुतार काम करण्यचा सुंदर अनुभव मिळाला. 

 
अभियांत्रिकी विभागात इ- ८ व ९ वी च्या विध्यार्थ्यांना थ्रेडिंग कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव upvc पाईपला थ्रेडिंग करून देण्यात आला. विद्यर्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पूर्ण केले.

अभियांत्रिकी विभागात इ-९व १० वी  वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी लेक्चर stand तयार करून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मापन, वेल्डिंग , पेंटिंग करण्याचा अनुभव घेता आला.


आमच्या शाळेत अभियांत्रिकी विभागात वेल्डिंग कामाचे प्रात्यक्षिक करताना तांदूळ मांडणी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला. व तो प्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पूर्ण केला . यामधून मुलांचा खूप चांगला सराव झाला. हा प्रकल्प पूर्ण केल्यामुळे शालेय पोषण विभागात आलेली तांदळाची पोटी ठेवण्याची गरज पूर्ण झाली.


     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...