Monday, 20 January 2020




सात ट्रे मध्ये मेथी लागवड करून ठिबक सिंचन व तुषार सिंचन सेट तयार करणे
           इयत्ता ८वी  च्या मुलींनी सात ट्रे घेऊन त्यामध्ये माती व शेणखत तीनास एक प्रमाणात घेऊन ट्रे मध्ये भरून घेतले नंतर 16 एम एम चे लेटरल पाईप घेऊन त्या ट्रे वर ठिबक सिंचन करून घेतले व दुसऱ्या साईडला  फॉगर लावून तुषार सिंचन सेट तयार केला त्यालाच फिश टँक मधील मोटर जोडून प्रेशर देण्यात आले व मोटर चालू केल्यास ट्रे मध्ये लावलेल्या मेथीला एका साईडला थेंबाथेंबाने पाणी मिळू लागले. तर दुसऱ्या साईडला फॉगर ने  पावसाच्या स्वरूपात पाणी पडू लागले. मुलींनी मेथीचे बी दहा रुपयाचे आणले होते. त्या बियांचे मेथीच्या भाजीत रूपांतर झाल्यानंतर मुलींनी भाजी काढली. त्यापासून सहा पेंढ्या मिळाल्या मुलींनी त्याची विक्री केली. त्यातून त्यांना 60 रुपये मिळाले.


No comments:

Post a Comment

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...