Monday, 1 April 2019

अभियांत्रिकी विभागात दुरुस्ती कामांतर्गत सुतार्कामातील बिजागरी बसविण्याच्या कामाचा अनुभव प्रत्यक्ष कामातूनच दिला जातो.
अभियांत्रिकी विभागात आमच्या शाळेतील बेंच, लेक्चर डेस्क .इत्यादींची दुरुस्तीची कामे आमचे विद्यार्थी नेहमी करत असतात.
अभियांत्रिकी विभागात  आमच्या शाळेतील शिक्षक श्री बाठे सरांनी लोखंडी टेबल बनवण्याची order दिलेली होती. त्याप्रमाणे मुलांनी डॉईग तयार केले . नंतर मापानुसार लोखंडी पाईप कापून नंतर तो वेल्डिंग च्या साह्याने जोडून घेतला.
अभियांत्रिकी विभागात शाळेतील परीक्षा विभातील स्टेशनरी ठेवण्याण्यासाठी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी सुतार् कामा अंतर्गत एक प्लायवूड पासून पेटी बनवून परीक्षा विभागात देण्यात आली. त्यामुळे मुलांना सुतार काम करण्यचा सुंदर अनुभव मिळाला. 

 
अभियांत्रिकी विभागात इ- ८ व ९ वी च्या विध्यार्थ्यांना थ्रेडिंग कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव upvc पाईपला थ्रेडिंग करून देण्यात आला. विद्यर्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पूर्ण केले.

अभियांत्रिकी विभागात इ-९व १० वी  वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी लेक्चर stand तयार करून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मापन, वेल्डिंग , पेंटिंग करण्याचा अनुभव घेता आला.


आमच्या शाळेत अभियांत्रिकी विभागात वेल्डिंग कामाचे प्रात्यक्षिक करताना तांदूळ मांडणी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला. व तो प्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पूर्ण केला . यामधून मुलांचा खूप चांगला सराव झाला. हा प्रकल्प पूर्ण केल्यामुळे शालेय पोषण विभागात आलेली तांदळाची पोटी ठेवण्याची गरज पूर्ण झाली.


     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...