Tuesday, 11 October 2016

उर्जा पर्यावरण विभागात मुलांनी तयार केलेत चार्जेबल स्टडी लॅम्प

पावसाचे दिवस असल्याने लाईट जाण्याचे प्रमाण जास्तच असते. अशा वेळेस आम्हाला अभ्यास करण्यास अडचणी निर्माण होत असे म्हणून आम्ही गावामधून बऱ्याच पप्रमाणात स्क्रॅप गोळा केले होते. त्यामुळे आम्ही याचा वापर स्टडी लॅम्प तयार करण्यासाठी ठरवले. Led बल्प, प्लायवूड,प्लास्टिक pvc पाईप वापरून चार्जेबल स्टडी लॅम्प तयार केलेत.


आय.बी.टी विभागातून इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलीत उपवासाची पदार्थ

आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या जास्त असल्याने मुलांना पौष्टिक व रुजकर पदार्थ देण्यासाठी कॅन्टीन चालवली जाते.गृह-आरोग्य विभागातील विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ या कॅन्टीन मध्ये ठेवत असतात. काही विद्यार्थी व स्टाप उपवास धरत असल्याने त्यांना तशी पदार्थ बनवून दिले जातात. आज आम्ही ४ मुलांच्या गटाने नायलन चिवडा तयार करून त्याचे वजन केले. व पॅकिंग करून विक्री साठी ठेवण्यात आले.



शाळेमध्ये या वर्षीपासून सुरु होत आहे माती परीक्षण केंद्र

  शिरवळ गाव व आजूबाजूच्या गावामध्ये बहुतेक करून शेती हा मुख्य व्यवसाय. आजकाल शेतकरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आहे,परंतु जमिनीस आवश्यक असणारे अन्नद्रव्य मात्र पुरेशा प्रमाणात मिळत नाही. यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक असते. परंतु आसपासच्या परिसरात माती परीक्षण केंद्र नसल्याने मोठा प्रश्न निर्माण होत असे. आमच्या शाळेत या पूर्वी माती परीक्षण केवळ शाळेतील शेतात करायचो.परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता आय.बी.टी या पूर्वव्यवसायीक अभ्यासक्रमांतर्गत  माती परीक्षण आता आपल्या गावात हा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाद्वारे निदेशक जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे माती परीक्षण करून देतील.

शेती व पशुपालन विभागात विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली.

हल्ली शेतकरी वेगवेगळी पिके शेतामध्ये घेत असतो. परंतु शेताला योग्य भाव मिळत नाही . परन्तु बदलत्या काळानुसार शेतीमधील पिकांची फेरपालट करणे फार आवश्यक आहे. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे कधीही फायद्याचे. आमच्या शेती विभागात देखील विद्यार्थी असे नियोजन करून पिके घेत असतात. इ ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली. त्यासाठी पाण्याचे, खताचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांनी केले.

आय.बी.टी विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या टेरेस वर फुलवली शेती.

आमचे शिरवळ गाव हे पूर्वी एक छोटेसे खेडे होते. परंतु आज गावातून जाणारा मुंबई- बँगलोर राष्ट्रीय महामार्ग , वाढते उद्योगधंदे यामुळे गावातील घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे अशातच शाळेतील आय.बी.टी या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी टेरेस वर फुलवली शेती. या मध्ये कोबी ,मेथी, फ्लॉवर, गुलाब, विविध कलम रोपे, आळू,कोथंबीर अशा विविध पालेभाज्या घेतल्या जातात.उन्हापासून सरंक्षनासाठी खास शेडनेट ची उभारणी केली आहे

गणेशोत्सवा निम्मित आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीसाठी आकर्षक मण्यांच्या माळा तयार केल्या.

गावागावात गणेशोत्सव मोठया उत्सवात साजरा केला जातो . अशा वेळेस बाजारपेठ वस्तू व पदार्थांनी पूर्ण भरलेली असते. मोठ्या प्रमाणात शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाते.अशा वस्तू जर आपण गावातच तयार केल्या तर मोठा प्रमाणत गावातील लोकांना रोजगार मिळेल. अशीच कल्पना आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुचली व त्यांनी मार्केट मधून मटेरिअल आणून आकर्षक शेभेच्या वस्तू व माळा तयार करून त्या शाळेमध्ये विक्री केल्या.




Friday, 7 October 2016

ज्ञान संवर्धनी विद्यामंदिर शिरवळ शाळेमध्ये इ १० वीच्या विद्यार्थ्यांनी बीजप्रक्रिया करून शेवग्याचे बी लावले

आपणास माहित आहे की शेतकऱ्याला आजकाल शेतात फळपिकाचे रोपे लावण्यासाठी दूर-दूरवरून रोपे आणावी लागतात.रोपे खात्रीची मिळतीलच असे नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच आमच्या शाळेतील विद्यार्थी आय.बी टी विभागांतर्गत शेती पशुपालन विभागात वेगवेगळ्या प्रकारची रोपे घेत असतात.इ १० वी च्या विद्यार्थ्यांनी माघील महिन्यामध्ये सिडलिंग ट्रे मध्ये शेवग्याची २०० बिया बीजप्रक्रिया करून लावल्या.

स्क्रॅप रॅली

आमच्या शाळेमध्ये प्रात्यक्षिक व प्रकल्प करण्यासाठी मटेरियल ची कमतरता भासत होती मग आम्ही मुलांनी व आमच्या आय.बी.टी च्या सरांनी स्क्रॅप रॅली  काढण्याचे नियोजन केले व त्यानुसार गावातून रॅली काढली त्यामुळे आम्हाला जवळ पास ५० किलो स्क्रॅप मिळाला त्यामुळे आम्हाला प्रात्यक्षिक व प्रकल्प करताना खूप मदत झाली त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारचे प्रकल्प करू शकलो.


विभाग मांडणी

आय.बी.टी विभागास चार खोल्या असून प्राज फाउंडेशन च्या मदतीने सर्व विभागातील टूल्स खरेदी केले त्यामुळे विभाग सुसज्ज झाले.मुलांना प्रात्यक्षिक व प्रकल्प करणे सोयीस्कर झाले त्यामुळे प्रकल्पांची प्रत सुधारली.




प्राज फौंडेशन चे श्री.केळकर सर यांची शिरवळ शाळेस भेट.

प्राज फाउंडेशन चे श्री.विनायक केळकर सर यांनी आमच्या शाळेस भेट देऊन निदेशकांशी चर्चा केली.तसेच आमच्या शाळेचे सचिव श्री.देशपांडे सर  यांच्याशी चर्चा केली त्यामध्ये आय.बी.टी मध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प करणे, तसेच समाजउपयोगी सेवा वाढविणे.त्यानंतर त्यांनी आय.बी.टी च्या चारही विभागांची पहाणी केली व मुलाची संवाद साधला.







शेडनेट गृह.



शाळेला जमीन कमी होती त्यामुळे त्यांनी शाळेच्या टेरेस वर शेती करण्याचा निर्णय घेतला मग त्यांनी टेरेस वर शेडनेट तयार केली टेरेस वर पॉलीथीन अंथरले त्यावर माती टाकली व वांगी,मिरची,कोबी ,मेथी,कोथिंबीर सारखी पिके घेतली,व त्यातून उत्पन्न घेतले तसेच अझोला बेड करून टो शाळेतील विद्यार्थी ना दिला. 

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...