Thursday, 29 August 2019


                      इलेक्ट्रिकल मिक्सर दुरुस्त करणे .

माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये मेक समथिंग वीक" या उपक्रमाअंतर्गत IBT विभागामधून घरगुती उपकरणे दुरुस्त करून देण्यात आली.यामध्ये इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मिक्सर दुरुस्त करून दिला . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरगुती उपकरणे दुरुस्त करण्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात करावयास मिळाले.






समाज उपयोगी सेवा – इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करणे .

माहिती - ज्ञानसंवर्धिनी विद्यालययामध्ये प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थ्यांचा जो दैनंदिन परिपाठ होतो त्या परिपाठासाठी IBT विभागामधून त्यांना एक इलेक्ट्रिकल बोर्ड तयार करून देण्यात आला. या इलेक्ट्रिकल बोर्डसाठी आलेला एकूण खर्च ७९७ रु. आला असून प्राथमिक विभागाला ९९६ रुपयांना तो बोर्ड विकण्यात आला. या विक्रीमध्ये एकूण १९९ रुपयांचा नफा झाला.
                    





हात धुण्यासाठी जंतुनाशक तयार करणे

दिनांक २७/६/२०१९ रोजी  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जंतुनाशकचा वापर करून हात धुण्याच्या योग्य पायऱ्या वापरण्याच्या प्रात्यक्षिक अंतर्गत स्वतः जंतुनाशक तयार केले. तसेच याच्या बॉटल तयार करून पालक व शिक्षक यांना विक्री केली 




दिनांक ८,९,१० ऑगस्ट २०१९ रोजी ज्ञानसंवर्धिनी  विद्यालयात MSFC या उपक्रमांतर्गत MAKE SOMETHING WEEK साजरा करण्यात आला. हे  तीन  दिवस स्टडी टेबल व टेबल तयार केले.   व शाळेतील बेंच दुरुस्तीची कामे केली. या उपक्रमात विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहाने भाग घेतला .










Wednesday, 24 July 2019

                        मोजमाप करण्याचे प्रात्यक्षिक 

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मापन व मोजमाप हे प्रात्यक्षिक शिकत असताना मैदानावर कबड्डी मैदानाचे मोजमाप प्रत्यक्ष करण्याचा अनुभव घेतला.



                                डस्टर बनवण्याचा प्रकल्प 

शैक्षणिक वर्ष  सन २०१९-20 मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी विभागात जून महिन्यात शाळेकडून 30 डस्टर बनवण्याची ऑर्डर घेतली. त्याप्रमाणे 30  डस्टर बनवून शाळेला दिले. त्यामुळे आमच्या शाळेतील मुलांच्या हाताला काम मिळाले . त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली.हे 30  डस्टर  बनवण्यासाठी ५२८ रु. खर्च आला. व नफा १३२ रु. मिळाला. 








Friday, 5 April 2019

गांडूळ खत तयार करणे.

इ. १० वी च्या मुलांनी शेणखत,पालापाचोळा,शेतातील तन ,वाळलेली झाडांची पाने तसेच गांडूळ यांचा वापर                                  करून गांडूळ खत तयार केले.

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...